नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील शिवपार्वती अपार्टमेंटमधील वाहनतळात एक अनोळखी 50-55 वर्ष वयोगटाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. वजिराबाद पोलीस ठण्यातील पोलीस अंमलदार एस.आर.मठपती यांनी जनतेला आवाहन करून या अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास शिवपार्वती अपार्टमेंटमध्ये असलेल्या वाहनतळात एक पुरुष मृतदेह सापडल्याची माहिती आल्यानंतर त्यासंदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू क्रमांक 85/2023 दाखल करण्यात आला. याबाबतचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस अंमलदार एस.आर.मठपती बकल नंबर 1218 यांच्याकडे देण्यात आली .
मठपती यांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार अनोळखी मयत हा 50-55 वयोगटातील आहे. त्याचा बांधा सडपातळ आहे. रंग सावळा आहे. उंची 170 सेंटीमिटर आहे. डोक्याचे केस काळे व पांढरे आहेत. अनोळखी मयताने फुल बाह्याचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्यावर विटकरी निळ्यारंगाच्या लाईन आणि पांढऱ्या रंगाचा जिन्स पॅन्ट परिधान केलेला आहे. एस.आर.मठपती यांनी जनतेला आवाहन केले आहे की, संबंधीत व्यक्तीच्या वर्णनानुसार किंवा छायाचित्रात दिसऱ्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्याबद्दलची माहिती पोलीस ठाणे वजिराबाद येथे द्यावी. वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 आणि एस.आर.मठपती यांचा मोबाईल क्रमांक 9422644113 यावर सुध्दा माहिती देता येईल.
50-55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला