नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी महिलांच्या चैनस्नेचिंग करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून 7 तोळे सोन्याचे गंठण जप्त केले आहे. याप्रकरणात सलग पध्दतीने 6 गुन्हे दाखल झाले होते. धर्माबाद पोलीसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका सराहित गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून 7 चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या. तसेच लिंबगाव पोलीस ठाण्यातील घडलेल्या एक किलो सोने देण्याच्या प्रकारात एकाला अटक करण्यात आली असून इतर गुन्हेगारांची नावे आम्हाला कळली आहेत अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदशी भंडरवार, भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलनवाड, धर्माबादचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 नोव्हेंबर रोजी एका वयस्कर महिलेला खाली पाडून त्यांच्या गळ्यातील चैन लुटण्याचा प्रकार घडला. त्या अगोदर सलग पाच गुन्हे घडले. यामध्ये सुध्दा महिलांच्या चैन बळजबरीने लुटण्याचा प्रकार घडला होता. वयस्कर महिलेच्या लुट प्रकरणात पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह 394, 397 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला. हा गुन्हा घडल्यानंतर आम्ही आठ वेगवेगळ्या पथकामार्फत पुर्वीपासूनच तपासणी करत होतो आणि हा वयस्कर महिलेचा गुन्हा घडला तेंव्हा आम्ही सर्व रस्त्यावर होतो अशी माहिती सुर्यमोहन बोलमवाड यांनी दिली. याप्रसंगी गाडीत आम्ही दोघेच असतांना मी उड्डी मारुन एका दुचाकी गाडीवरील स्वाराला खाली पाडले तेंव्हा त्याला पकडण्यामध्ये भरपूर झटापट झाली त्यानंतर त्याला ताब्यात घेवून आम्ही दुसरा आरोपी पकडला ही माहिती सांगितली. या दोन चोरट्यांची नावे सलमान खान असलम खान (28) रा.अदनान गार्डन धनेगाव, तौफिक खान आयुब खान(24) रा .बिलालनगर नांदेड अशी आहेत. यांच्याकडून जवळपास 70 ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि 3 लाख रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी पथकात मेहनत घेणारे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड, पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे, हनमंता कदम, कळके आणि ओमप्रकाश कवडे यांचे कौतुक केले आहे .
पोलीस ठाणे लिंबगाव येथे एका व्यक्तीला कमी किमतीत अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखवून बोलावून त्याला मारहाण करून त्याच्याकडील 10 लाख रुपये बळजबरीने चोरण्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात अर्जुन शिंदे रा.उमरी, राहुल पवार रा.मुदखेड, अनिल मारकुळे रा.वसमत, सुरेश पवार रा.वसमत, पिऱ्या गोरे, किशन गोरे, लखन येरंडले, सोन्या काळे या सर्वांनी मिळून ही 10 लाख रुपयांची लुट केली होती. त्यातील अनिल रंगनाथ मारकुळेला अटक करण्यात आली आहे.
धर्माबाद येथे एक दुचाकी चोरीचा गुन्हा घडल्यानंतर येथे एक दुचाकी चोरी घाल्यानंतर पोलीसांनी मदनुर ता.धर्माबाद येथील युवक साईनाथ मारोती मॅकलवाड (18) यास ताब्यात घेतले. त्या प्रकरणात तपास केला असता त्या चोरट्याने 7 दुचाकी गाड्या चोरल्याचे सांगितल्यानंतर त्याच्याकडून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार खंडेराय धरणे, धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपत यांनी पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन, पोलीस अंमलदार सुदाम आडे, कुमरे, सचिन गडपवार, वडजे, दारे बोईनवाड यांचे कौतुक केले आहे.
