नांदेड(प्रतिनिधी)-नागरीकांना दिवाळी पहाटच्या निमित्ताने सांस्कृतिक मेजवाणी मिळावी म्हणून बसवेश्र्वर लॅन्ड डेव्हलपर्सच्यावतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन 11 नोव्हेंबर रोजी शनिवारी करण्यात आले आहे अशी माहिती निमंत्रक अनिल शेटकार यांनी दिली आहे.
नांदेडकरांना दिवाळी पहाटच्या निमित्ताने नांदेडकरांना एक आगळीवेगळी मेजवाणी म्हणून लोकप्रिय गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याची संकल्पना उद्योजक अनिल शेटकार यांनी मांडली. तर निर्मिती आणि निवेदन दिवाकर चौधरी, निर्मिती सहाय्य प्रा.सौ.अश्र्विनी जोशी (आडे), तंत्रसहाय्यक संजय जगदंबे यांच्या माध्यमातून दिवाळी पहाट हा कार्यक्रम दि.11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता नियोजित अनिल लॉन्स निळा रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आर्य वैश्य समाज जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, निमंत्रक अनिल शेटकार, सौ.आशा अनिल शेटकार, निखील लातूरकर, अनिल कुलकर्णी, गिरीश जाधव, बालाजी बनसोडे अध्यक्ष तेली समाज,लक्ष्मण क्षीरसागर सचिव तेली समाज, राम आचेमवाड बेलदार समाज उपाध्यक्ष, विनायक सगर भाजपा ओबीसी आघाडी, व्यंकट दुधंबे, धानोरकर टाक, बिंगेवार जे.एल.पद्मशाली समाज अध्यक्ष आणि व्यंकट चिलवरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बसवेश्र्वर लॅन्ड डेव्हलपर्स आयोजित दिवाळी पहाट