नांदेड(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये थोतराने आवळून 65 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी जन्मठेप आणि 21 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे .
दि .20 नोव्हेंबर 2020 रोजी बाबाराव राणबाजी गजभारे (65) रा.वसरणी यांच्यासोबत गंगाधर पांडूरंग सुर्यवंशी (44) रा .निवघा ता.मुदखेड यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणमधून वाद झाला. त्यावेळी गंगाधर पांडूरंग सुर्यवंशीने बाबाराव राणबाजी गजभारे यांच्या गळ्यात धोतराने आवळ घालून त्यांचा जिव घेतला होता. त्यावेळी पोलीस ठाणे इतवारा येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 504 नुसार गुन्हा क्रमंाक 370/2020 सुरेश बाबाराव गजभारे यांच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला होता . तत्कालीन पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला क्रमांक 52/2020 या क्रमांकानुसार चालला. ज्यामध्ये 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सौ.ए.जी.कोकाटे यांनी काम केले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गंगाधर पांडूरंग सुर्यवंशी (44) रा.निवघा ता.मुदखेड यास जन्मठेप आणि 21 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली. इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पंडीत कदम यांनी पैरवी अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पुर्ण केली.
65 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला जन्मठेप