नांदेड (प्रतिनिधी)-50 हजार मोदकांचा उलगडा आज झाला. ते 50 हजार मोदक कोणी खर्च केले, कुठे केले आणि योगेश्र्वराला काय त्रास झाला याची स्पष्टता आज समोर आली.आज दिवाळीनंतरची प्रतिपदा आणि आज अंधार पडल्यानंतर पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत झाली आहे.
मागील दोन दिवसांपासून वास्तव न्युज लाईव्ह स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीचा दावेदार कोण यावर वृत्त प्रसिध्द करीत आहे. तरी पण म्हणतात ना सत्ते पुढे शाहणपण चालत नाही आणि अखेरच असे झालेच.पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी मला स्थानिक गुन्हा शाखा नको असा अर्ज लिहुन दिला आणि त्या अर्जानुसार त्यांच्या जागी उदय खंडेराय यांची नियुक्ती झाली. उदय खंडेराय हे नांदेडचे भुमिपूत्र आहेत. सन 2020 मध्ये सुध्दा असेच घडले होते . स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकाकडून असाच अर्ज लिहुन घेण्यात आला होता. ते पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी रामराव गाडेकर यांची नियुक्ती झाली. परंतू नियतीने त्यांना फक्त 13 दिवसांचा कार्यकाळ दिला. त्यानंतर सुध्दा तत्कालीन पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली होती.त्यानंतर काही दिवस शिवाजी डोईफोडे हे स्थानिक गुन्हा शाखेवर कार्यरत राहिले. पुढे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी 46 महिने एवढा मोठा कार्यकाळ स्थानिक गुन्हा शाखेत पुर्ण केला.
उदयजी खंडेराय 50 हजार मोदकांचा हिशोब कसा होणार ? त्यासाठी आपल्याला काय-काय करावे लागेल. ते तुम्ही करणारच आहात पण अशा पध्दतीने कोणा एका नावाचा शिक्का आपल्या मागे लावून तुम्ही उत्कृष्टपणे कार्य करणार आहात काय? आपल्या मेहनतीने आपण खाकी वर्दी प्राप्त केली. ही खाकी वर्दी अन्यायग्रस्ताला न्याय देण्यासाठी आहे . आता न्याय कोणाला देणार तुमची नियुक्ती करून घेणाऱ्या नेत्याला की, सर्वसामान्य माणसाला? आपण विद्याविभुषीत आहात पण झालेले काम हे लोकांना कळणार नाही काय? आणि लोकांना कळणार नाही तर वास्तव न्युज लाईव्ह काय करेल?
या संदर्भाने प्रेसनोट काढून पोलीस विभागाने स्वत:ची नाचक्की करून घेतली 19 फेब्रुवारी रोजी ते स्वत: एलसीबीच्या खुर्चीचे दावेदार होते. न्यायालयाने मागच्या पोलीस निरिक्षकांना स्थगिती दिली म्हणून त्यांना थांबावे लागले.पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर सेवानिवृत्त झाले म्हणजे जगदीश भंडरवार यांचा 19 फेबु्रवारीचा आदेश कायम होता. प्रेसनोटमध्ये ते परस्पर हजर झाले असे लिहिले आहे मग जगदीश भंडरवार यांचा अर्ज कसा काय घेतला. योगेश्र्वरजी आपल्या भक्तांना सर्व काही कळत असते आणि म्हणूनच आमच्या मालकाने केलेल्या कार्यप्रणालीविरुध्द बोलण्याचा हक्क आम्हाला नाही. तरी पण असो आपल्याल आपले काम करावे लागते. आम्हाला सत्य मांडल्याशिवाय राहीले जात नाही हीच तर आमची चुक आहे. आमच्या शब्दातून कोणाला दुखावले असेल तर ते दुखावणे त्यांचा स्वत:चा प्रश्न आहे. ज्या नेत्याने आपल्याला आलेली धमकी 8 महिन्यानंतर जाहीर करुन स्वत:साठी सुरक्षा वाढवून घेतली हे काही लपलेले आहे काय? असो उदयजी खंडेराय आपण चांगले काम करावे यासाठी शुभकामना…
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/13/आता-नेत्यांचेच-चमचे-करू-ल/