नांदेड(प्रतिनिधी)-दि.10 नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची तक्रार एका महिलेने वजिराबाद पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर रोजी दिली पण आज 14 नोव्हेंबरपर्यंत तरी त्या तक्रारीवर काहीच पावले उचलले गेली नाहीत असे त्या महिलेच्या मुलाने सांगितले आहे. कारण ज्या माणसाविरुध्द महिलेची तक्रार आहे तो वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार आहे.
दि.11 नोव्हेंबर रोजी एका महिला पोलीस ठाणे वजिराबाद येथे गेली. त्यांनी सांगितले की, 10 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजता ते राहतात त्या घरामागे दुसऱ्या गल्ली जाण्यासाठी असलेल्या गेटला लावलेले कुलूप उघडण्यासाठी त्यांनी पोलीस अंमलदार अजय यादव यांच्या पत्नी कल्पना यांच्याकडे गेटची चाबी मागितली. त्यावेळी वाद झाला. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता अजय यादवने त्यांचा मुलगा आदित्य शर्मा यास धक्काबुक्की करतांना पाहुन मी अजयसमोर गेले आणि तुम्ही मुलाशी का वाद घालता अशी विचारणा केली असता अजय यादवने मला पण धक्का दिली मी खाली पडले. ही माहिती पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीसांनी त्या महिलेला सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी सरकारी रुग्णालयाने एमएलसी क्रमांक 6160 नोंदवून त्याची माहिती पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे वजिराबाद यांना पण दिली. त्यानंतर सुध्दा त्यांचा जबाब कोणी घेतला नाही. महिलेचा मुलगा आदित्य वास्तव न्युज लाईव्हला सांगत होता की, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता माझ्या आईचा अर्ज घेतला आहे पण त्यावर आज 14 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तेंव्हा वास्तव न्युज लाईव्हच्या वतीने नांदेडच्या नागरीकांना विनंती आहे की, पोलीसांशी भांडण करून नका तुमची तक्रार घेतली जाणार नाही. आणि विशेष तर वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीसाविरुध्द तक्रार घेणे अशक्य बाब आहे असे या घटनेवरुन स्पष्ट होते.
नागरीकांनो पोलीसांशी भांडण करू नका तुमची तक्रार दाखल होणार नाही