नांदेड(प्रतिनिधी)-एमजीएम कॉलेज रस्त्यावरील नाथनगर पाटीजवळ एका युवकाचा खून करून आपल्या भावाच्या खूनाचा बदला घेणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे.
नाथनगर पाटीजवळ 12 नोव्हेंबर रोजी भरत पवार या युवकाचा खून झाला होता. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात विश्र्वास परमेश्र्वर शिंदे, त्याची आई आणि दोन मित्र अशा तिघांची नावे आरोपी सदरात होती. विमानतळ पोलीसांनी सर्वप्रथम विश्र्वास शिंदेच्या आईला अटक केली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार विश्र्वास परमेश्र्वर शिंदे (21) आणि त्याचा एक मित्र शिवम दत्तराम आंभोरे (19) या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने भोकर फाटा परिसरात अटक केली. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण केल्यानंतर भरत जाधव मरण पावल्याची माहिती मिळाल्यानंतर मारहाण करणाऱ्या तिसऱ्या युवकाने काही तरी विषारी औषध पिले असल्याची माहिती आहे. परंतू प्रशासनिक स्तरावरून त्यास कोणी दुजोरा देत नाही. पकडलेले दोन विश्र्वास आणि शिवम यांना पुढील तपासासाठी विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी यांनी या दोन मारेकऱ्यांना पकडण्यात मेहनत घेतली.
संबंधित बातमी….
https://vastavnewslive.com/2023/11/13/दिवाळीच्या-दिवशी-भावाच्य/