
जीवनात नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे अशा शब्दात धीरुभाई अंबानी यांनी युवकांना प्रेरणा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नाही या शब्दाला फाटा देत आणि जीवनातील सतत प्रयत्न करून आपल्यामध्ये प्रगती घडविण्यासाठी धडपड करणाऱ्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आणि नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी प्रगती आणणारा ठरावा या शब्दांसह जन्मदिनाच्या शुभकामना…
बिहार राज्यातील मुंगेर या जिल्ह्यातील धावनी या छोट्याशा गावात कृत्यानंद आणि विद्यादेवी यांच्या संसारात अबिनाशकुमार नावाचे दुसरे पुष्प उमलले. मुंगेर जिल्हा नक्षल प्रभावीत आहे. या राज्यात बंदुका बनवणे हा बहुतांश लोकांचा व्यवसाय आहे. या जिल्ह्यात अबिनाशकुमार यांचा जन्म झाला. त्यांच्यापेक्षा मोठे बंधू मनिषकुमार हे कोलकत्ता येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कृत्यानंद चौधरी हे बिहार राज्यातील रोड कंस्ट्रक्शन विभागात कार्यरत होते. प्राथमिक शिक्षण धावनी या गावात घेवून अबिनाशकुमार यांनी अभियंता पदवी भुवनेश्र्वर येथून पुर्ण केली. त्यानंतर कॅट परिक्षा देऊन नागपूरमध्ये एमबीएच्या पदवीसाठी प्रवेश मिळवला आणि शिक्षण घेता-घेताच कॅम्पस् सलेक्शनमध्ये त्यांची निवड आयसीआयसीआय बॅंकेत झाली आणि त्यांना हरीयाणा राज्यातील गुडगाव येथे नियुक्ती मिळाली. आयसीआयसीआय बॅंकेत त्यांनी दोन वर्ष संपत्ती व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर भारतीय अन्न महामंडळात त्यांची निवड झाली. त्यात सुध्दा त्यांनी दोन वर्ष सेवा दिली. पण आपल्या जीवनात सतत प्रगती व्हावी हा मुळ उद्देश प्रारंभीपासून आपल्या मनात जपून ठेवलेल्या अबिनाशकुमार यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देत राहिले. कारण आपल्या सतत प्रयत्नांमुळेच आपली प्रगती होईल. आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाही. ज्या संसाधनांची आपल्याकडे उपलब्धता आहे त्यातूनच आपल्याला मेहनत करून स्वत:मध्ये प्रगती करायची आहे. हा मानसीक विचार आपल्या मनात बाळगुन समुद्र पार करायची तयारी ठेवत त्यांनी पहिल्यांदा लोकसेवा आयोगामार्फत भारतीय महसुलसेवा (आयआरएस) पद मिळवले. त्यात त्यांना आयकर विभागात सहाय्यक अधिक्षक पदावर नियुक्ती मिळाली. यानंतर सुध्दा त्यांना आपल्या प्रगतीची मर्यादा पुन्हा एकदा वाढविली पाहिजे हा ध्यास मनात ठेवून त्यांनी लोकसेवा आयोगाची दुसरी परिक्षा उत्तीर्ण केली आणि सन 2018 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेत प्रवेश मिळाला. त्यानंतर आपले प्रशिक्षण पुर्ण करून परिवेक्षाधिन कालावधी कोल्हापूर जिल्ह्यात पुर्ण केला आणि त्यानंतर त्यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक ही पहिली नियुक्ती परभणी जिल्ह्यात मिळाली. दरम्यान सन 2019 मध्ये वैद्यकीय शिक्षणात क्ष-किरणमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ.गर्वितासिंह यांच्यासोबत आई-वडीलांनी लग्न करून दिले. त्यानंतर अबिनाशकुमार आणि डॉ.गर्वितासिंह यांच्या फुलबागेत अन्विषा हे फुल उमलले. डॉ.गर्वितासिंह सुध्दा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आपल्या सेवा जनतेसाठी देत असतात.

आपल्या जीवनात वेळेचे कसे महत्व आहे.हे अबिनाशकुमार यांनी पुर्णपणे ओळखलेले आहे. काही दिवसांपुर्वी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात क्रिकेट सामना झाला. सुरूवातीची फलंदाजी श्रीलंकेने केली. एक खेळाडू आऊट झाल्यानंतर अँजीलो मॅथ्थुज हा खेळाडू फलंदाजी करण्यासाठी आला परंतू त्याची चुक झाली आणि त्याने डोक्यावर लावण्याचे हेल्मेट स्वत:च न आणता दुसऱ्याचे आणले.क्रिकेट नियमावलीप्रमाणे एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज दोन मिनिटात क्रिकेट मैदानावर आला पाहिजे. पण अँजीलो मॅथ्युजची गोची झाली. त्याला दुसरे हेल्मेट पाहिजे आणि ते आणण्यासाठी तो जात असतांना बांगलादेशाच्या कर्णधाराने पंचांकडे याबाबत तक्रार केली. अँजीलो मॅथ्थुजने स्वत: बांगालादेशच्या खेळाडूंना माझी काही मोठी चुक नाही, तेंव्हा मला माझे हेल्मेट आणू द्या अशी विनंती केली. परंतू बांगलादेशचा कर्णधार साकीब हसनने त्याना नम्र उत्तर दिले तो म्हणाला, आम्ही पंचासमोर अपील केले आहे म्हणून निर्णय ते घेतील. पंचांनी अँजीलो मॅथ्थुजला एकही चेंडू न खेळता बाद केले. याचा अर्थ असा आहे की, आपल्या जीवनातील वेळ ही किती महत्वपूर्ण आहे. बांगलादेशाने अँजीलोची चुक हेरली कारण त्यांना नियमांची माहिती होती आणि अँजीलोची चुक त्याच्या देशाच्या पराभवामध्ये कारणीभुत ठरली. कारण तो खेळला असता तर कदाचित 50 धावा जास्त झाल्या असत्या आणि बांगलादेशाला श्रीलंका चांगल्यारितीने स्पर्धा देऊ शकला असता. अशाच प्रकारे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे महत्व लक्षात ठेवत अबिनाशकुमार यांनी कधीच चुक होवू दिली नाही आणि आपल्याला खुप दुर जायच आहे हे भान ठेवून आपल्या जबाबदाऱ्यांना पुर्णपणे न्याय देत आज ते नांदेड मध्ये अपर पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत . हा विहित कालखंड पुर्ण झाल्या नंतर त्यांना पोलीस अधिक्षक पद मिळेल त्यानंतर तर भरपूर आव्हाने आहेत. आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी लाखो क्षण अपुरे पडतात. आपल्या जीवनातील एक चुक आपल्या जीवनाला दिशाहिन करण्यासाठी कारणीभुत ठरते. म्हणून यशाचे शिखर गाठण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात आणि ती आव्हाने पेलण्यासाठी अबिनाशकुमार स्वत:मध्ये दररोज प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशिल राहतात.

काही दिवसांपुर्वीच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्यांच्या नाकाजवळ खरचटले, त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ केसाएवढे फॅक्चर झाले तरीपण कोणतीही उसंत न घेता ते आपले कर्तव्य बजावतांना कोठेच कमी पडत नाहीत. काही दिवसां पुर्वी सराफा भागात झालेल्या खून प्रकरणानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून ते स्वत: त्या भागात ठाण मांडून राहिले कारण एका हल्लेखोर जमावाने एका युवकाचा खून केला होता. जीवनाच्या खेळात सर्वच गोष्टी ह्या आपल्या इच्छेनुसार होत नसतात. यश या शब्दाला आकार देण्यासाठी आयुष्यातल्या अनेक आनंदांना पाठमोरे करावे लागते. कारण आयुष्याच्या खेळात तडजोड नावाच वापर योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरता आला की आयुष्य सुखकर आणि आनंदी होत असत. आपल्या जीवनात कोणतीही परेशानी ही आपल्यातील हिंमतीपेक्षा मोठी नाही. हा संकल्प आपल्या मनात ठेवून सतत हसत मुखाने आपल्या कर्तव्याच्या खुर्चीवर बसतांना अबिनाशकुमार कधीच थकलेले दिसत नाहीत.
अबिनाशकुमार यांचा जीवन प्रवास प्रेरणा आणि जिद्द अशा दोन गोष्टींनी भरलेला आहे. या दोन गोष्टी त्यांनी आपल्या मनात भरून ठेवल्या आहेत आणि त्या दोन गोष्टी अबिनाशकुमार यांना चालण्यास प्रवृत्त करत राहतात. पुढे याच गोष्टी त्यांना पळायला लावतील आणि पळायला लागले की, ध्येय गाठण्यात सहजता येईल. ज्याप्रमाणे एक थेंब आळवावरचा मोत्याच रुप घेवून मिरवतो त्याच प्रमाणे आज अबिनाशकुमार यांच्याकडे पाहण्याची गरज आहे. कारण त्यांनी प्राप्त केलेल्या गोष्टीमुळे त्यांच आयुष्य बदलून गेल आहे. आता अबिनाशकुमार यांना गुरू आणि रस्त्यांसारख वागायला हव.कारण हे दोघे आहे त्याच ठिकाणी राहतात परंतू दुसऱ्या त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचविण्यात मदत करतात. ज्याप्रमाणे जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टींचे दर महत्वपुर्ण असतात त्याप्रमाणे आपल्या जीवनातील कचऱ्याची किंमत सोनाराच्या कचऱ्यापेक्षा जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा तरच तुमच्या भविष्यातील जिवन हे इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.Get up everyday with positive mission.. Because you deserve to live an amazing life.. आमच्या शब्दांप्रमाणे आपले भविष्यातील जीवन चालावे ही अपेक्षा ठेवूनच आम्ही हा शब्द प्रपंच केला आहे. सोबतच what is said and what is lift unsaid can change the course of the future.. Beware the power of words…या वाक्याप्रमाणे आपल्या जीवनात आपल्याला शब्दांची ताकत ठेवूनच जगले पाहिजे, या शब्दांसह आपल्याला जन्मदिनाच्या शुभकामना…
