आयटीआय परिसरात 17 वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.17 नोव्हेंबरचा सुर्योदय होताच आयटीआय ईमारतींच्या मागे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा मृतदेह सापडला आहे. त्या संदर्भाने अद्याप काही स्पष्ट नाही की, हा खून आहे किंवा कसे? या बालकाच्या कवटीला पुर्णपणे जनावरांनी खाल्याचे दिसत आहे. शिवाजीनगर पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
आजचा सुर्योदय झाला तेंव्हा आयटीआयच्या मोकळ्या मैदानात एक मृतदेह सापडला. निळी जिन्स, पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या अवस्थेत हा बालक पडलेला होता. त्याच्या हातावर एस.पी. असा टॅटू तयार केलेला होता. बरेचवेळ या बालकाची ओळख पटली नाही. परंतू एस.पी. या टॅटूने त्याची ओळख पटली आणि तो प्रतिक महेंद्र शंकपाळ (17) रा.आंबेडकरनगर(फायर स्टेशनसमोर) नांदेड असा होता. या बालकाची फक्त कवटी दिसत होती.कवटीवरील सर्व मास आणि मेंदु गायब होता. दिसत्या परिस्थितीत या बालकाच्या कवटीला जनावरांनी खाल्यासारखे वाटत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रतिक मागिल चार दिवसांपासून घरी आला नव्हता. तो नेहमी असेच करायचा म्हणून त्याच्या कुटूंबियांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात न देता शोध घेत राहिले. परंतू आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर वैद्यकीय अहवाल येईल आणि खरे काय घडले याचा उलगडा होईल. बालकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *