जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम संपन्न

नांदेड,(जिमाका)- जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

 

शारीरिक कष्टाची कामे दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे मधुमेहासारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम करावा. आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. संतुलित आहार घ्यावा. जेणेकरून रुग्णांना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .एन. आय. भोसीकर यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.

 

 

 

सर्वप्रथम मधुमेह तज्ञ डॉ. दत्तात्रय इंदुरकर यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून मधुमेहा संदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. विखारुनिसा खान यांनी उपस्थित रुग्णांना मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची करणे कोणती, मधुमेह झालेल्या रुग्णांनी आहार कोणता घ्यावा. इत्यादी संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. तजमुल पटेल यांनीही उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. विद्या झिने, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. अभय अनुरकर डॉ.एच.के.साखरे, डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. तजमुल पटेल, डॉ. विजय पवार, डॉ. उमेश मुंडे तसेच रुग्ण व त्यांची नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *