नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी आयटीआय परिसरात सापडलेल्या अल्पवयीन बालकाच्या खूनाचा उलघडा स्थानिक गुन्हा शाखेने 12 तासात करून दाखविला. या प्रकरणात एका नामांकित गुन्हेगारासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह स्थानिक गुन्हा शाखेने पकडून शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मित्र असणाऱ्या प्रतिकचा खून त्याच्या मित्रांनीच केलेला आहे.
आज सकाळी आयटीआय परिसरात प्रतिक महेंद्र शंकपाळ (17) याचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्यावरील मास आणि काही खांद्याजवळी मास काही कुत्रांनी खाले होते. त्याची फक्त कवटी दिसत होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 411/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल झाला होता. या प्रकरणात मारेकरी अज्ञात होते.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आपल्या मेहनतीने त्यातील दोन आरोपी खडकपुरा भागात पकडले. त्यातील एकाचे नाव आवेस ईस्माईल पठाण (20) रा.बालाजीनगर, हिंगोली नाका नांदेड असे आहे. दुसरा एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. या दोघांना विचारपुस केल्यानंतर त्यांनी प्रतिक महेंद्र शंकपाळचा खून केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराय कर्ले, विठ्ठल शेळके, ज्वालासिंग बावरी, देवा चव्हाण, गजानन बैनवाड, विलास कदम, मारोती मुंडे यांनी मेहनत करून आरोपी पकडले आहेत.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/17/आयटीआय-परिसरात-17-वर्षीय-बा/