माहूरात उध्दव ठाकरे गटाकडून स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

श्रीक्षेञ माहूर(प्रतिनिधी) – हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे,अश्या जोरदार घोषणा देत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माहूर तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी माहूर शहरातील टि पाॅईन्ट येथे असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

यावेळी किनवट – माहूर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, ज्येष्ठ पत्रकार नंदुसंतान, जवाहरलाल जयस्वाल, शिवसेना कामगार आघाडी जिल्हाप्रमुख धुळे पंकज बारसकर उपजिल्हा प्रमुख जितु चोले,शहर प्रमुख निरधारी जाधव, युती तालुका प्रमुख सुरेखा तळणकर,युवासेना शहर प्रमुख संदीप गोरडे, विजय तिवसकर,गजानन चव्हाण, कनिष्क वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *