विठ्ठल नामाच्या जयघोषात गोदा परिसर दुमदुमला

नांदेड (जिमाका) – आनंदी विकास यांचा ‘गोदाकाठी विठ्ठलमेळा’ रंगला – ‘तू माझी माऊली’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘शरण शरण न सोडी हे चरण’, ‘तू वेडा कुंभार’, ‘नाही पुण्याची मोजणी’, ‘चिंबाडल्या रानी’, ‘नादश्रुती माय’ अशा एक ना अनेक विठ्ठलभक्तीच्या रचनांनी नांदेडच्या गोदावरीचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका गुरुद्वारा बोर्ड नागरी सांस्कृतिक समिती यांच्यावतीने आयोजित दिवाळी सांज या कार्यक्रमाचे.

 

 

 

या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तीगीतांचा ‘गोदाकाठी विठ्ठल मेळा’ हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेलेल्या गोदावरीच्या बंदा घाटावर झालेल्या या कार्यक्रमात गायक संगीतकार आनंदी विकास, विश्वास अंबेकर, शुभम कांबळे, अपूर्वा कुलकर्णी, मिताली सातोनकर, तानाजी मेटकर तर वादक कलावंत विकास देशमुख, वेदांत कुलकर्णी, राघव जोशी, अमोल लाकडे, विठ्ठल चुनाळे, हावगी पन्नासे आदी वाद्यवृंदाने सुरेख साथ संगत केली. प्रसिद्ध कवी देविदास फुलारी व पद्माकर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *