नांदेड,(प्रतिनिधी)- मराठा आंदोलनासाठी क्रांती करावयाची आहे यासाठी हडको परिसरातील शाहू नगर भागातील संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा संघटक ,तरूण युवक साईनाथ व्यंकटी टरके वय ३२ वर्ष यांनी पॅट मधील खिशात चिटी लिहुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ नोव्हेंबर २३ रोजी रात्री निवासस्थानी आत्महत्या केली, या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मुत्यु नोंद केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडील वामन व्यंकटी टरके यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माझा मुलगा मयत साईनाथ टरके हा मागील दहा दिवसापासून मला मराठा आरक्षणासाठी क्रांती करावयाची आहे असे म्हणत होता, त्यांनी गळफास घेऊन निवासस्थानी १८ तारेखेला रात्री १२.४४ मिनिटांचा पुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांने पॅट खिशात पॅकेट मध्ये मी मराठा आंदोलन क्रांती साठी जिवन संपवत आहे, एक मराठा लाख मराठा असे लिहिले असल्याचे नातेवाईक यांनी सांगितले, अशी फिर्याद दिली आहे,या प्रकरणी आकस्मिक मुत्यु १४८/२२३ सिआरपिसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली, घटनास्थळी पंचनामा केल्या नंतर मयताचे शवविच्छेदन साठी मृतदेह हा रात्री शासकीय रूग्णालयात नेण्यात आला,या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक यु.डी.बुक्तरे हे करित आहेत. मयत यांच्या पार्थिव देह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविला असुन शासकीय रुग्णालयात व मयत निवासस्थानी मराठा समाज बांधवांनी व नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती,
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मयत यांच्या पार्थिवदेह कुंटूब यांच्या ताब्यात देण्यात आल्या नंतर मुळगावी किवळा ता. लोहा. जिल्हा नांदेड येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी नातेवाईक व मराठा समाजीक ,अनेक सामाजिक,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी,मराठा आंदोलक बांधवांची, पदाधिकारी व कार्य करते,यांचा उपस्थिती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत साईनाथ व्यंकटी टरके वय ३२ वर्ष यांच्या पश्चात आई वडील, पत्नी,मुलगी ,तिन बहीणी,असा परिवार आहे. मयत संभाजी टरके हा संभाजी ब्रिगेडच्या विविध आंदोलनासह छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती व महोत्सव मध्ये सहभाग असायचा, मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील हा सहावा बळी झाला आहे.