नांदेड(प्रतिनिधी)-येथील व्यापारी नागनाथ स्वामी यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ स्वामी यांना राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती दिली. त्यांनी व्यापारी आघाडीच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केल आहे. स्थानिक महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना मोठ्याप्रमाणात एलबीटी कर लावला होता हा कर रद्द करण्यात यावा यासाठी व्यापारी आघाडीच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला होता. त्यात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.याचबरोबर शहरातील महात्मा बसवेश्र्वर पुतळा बसविण्यात यावा यासाठी आंदोलन, उपोषणे देखील केले. एवढेच नसून त्यांच्यावर त्या दरम्यान गुन्हे देखील दाखल झाले होते. पक्ष वाढीच्या बाबतीत केलेले काम पाहुन पक्षाने त्यांची राज्य कार्यकारणीवर निवड केली. या निवडीचे पत्र भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, खा.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, दिलीपसिंघ सोढी आदींनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नागनाथ स्वामी यांची भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड