प्रतिक शंकपाळच्या दोन मारेकऱ्यांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-एका बालकाला मारुन तीन दिवसानंतर त्याचे प्रेत सापडले तेंव्हा त्याच्या छातीवर खंजीरने पाच जखमा होत्या. तीन दिवसात त्याची पुर्ण कवटी उघडी झाली होती. जनावरांनी त्यातील मास खाले होते. या खून प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जण सहभागी आहेत. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सु.ल.यलदी यांनी दोन जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.17 नोव्हेंबर रोजी आयटीआय परिसरातील मोकळ्या जागेत एका अल्पवयीन बालकाचे प्रेत सापडले. त्याचे नाव प्रतिक उर्फ चिंक्या महेंद्र शंकपाळ असे आहे. या प्रकरणी 17 नोव्हेंबर रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी प्रयत्न करून तिन्ही आरोपींना पकडले. त्यात एकाचे नाव आवेज खान ईस्माईल खान पठाण (18)रा.बालाजीनगर नांदेड आणि शेख फैजान शेख अशफाक (18) रा.मकदुमनगर नांदेड यांना पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांचे सहकारी पोलीस अंमलदार एस.सी.दुर्रानी, देविसिंग सिंगल, शेख अजहर, होमगार्ड जवान मोहम्मद हाजी यांनी न्यायालयात हजर केले. घडलेल्या घटनेचा तपास सविस्तर करता यावा म्हणून मोहन भोसले यांनी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सु.ल.यलदी यांनी आवेज खान आणि शेख फैजान या दोघांना तीन दिवस अर्थात 21 नोंव्हेबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणातील तिसरा आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले असून बाल न्याय मंडळाने त्यास सध्या आपल्या देखरेखीत ठेवले आहे.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/11/17/प्रतिक-शंकपाळचे-मारेकरी/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *