सुरेखा तळनकर
श्रीक्षेत्र माहूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे सोमवार ता.२० नोव्हें.२०२३ रोजी स.९-३० वाजताचे सुमारास माहूर नगरीत आगमन झाले.त्यानंतर सकाळी १० वा.श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन महाआरती केली.या विधीचे पौरोहित्य वेशासं रविंद्र काण्णव व शंतनु रिट्ठे यांनी केले.
संघप्रमुख मोहन भागवत यांचे माहूर शहरात आगमन होताच प्रथम त्यांनी मातृतीर्थ तलावाला भेट दिली. श्री रेणुकामाता मंदिराच्या पायथ्यापासून डोलित बसून त्यांनी मंदिर गाठले. दर्शनानंतर मंदिर कार्यालयात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर व सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी रेणुका मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी कोषाध्यक्ष तथा तहसील किशोर यादव,विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,विनायक फांदाडे,दुर्गादास भोपी,अरविंद देव व आशिष जोशी यांची उपस्थिती होती.माहूर शहरात परतल्यावर पुजारी अनिल काण्णव यांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांनी प्रसाद ग्रहण केला.तदनंतर मोजक्याच जिल्हास्तरीय स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.दू.४ वा. शहरातील वेदपाठ शाळेला भेट देऊन बटुंशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माहूर नगरी सोडली.दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक.खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात व माहुर पोलीस स्टेशन चे डॉ.नितीन काशीकर यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.