नांदेड(प्रतिनिधी)- श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंती निमित्त हुजूर साहिब नांदेड येथून बिदर येथे जाण्या करीता विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. हि विशेष गाडी पूर्ण पणे अनारक्षित असेल : 01. गाडी संख्या 07505 हुजूर साहिब नांदेड ते बिदर विशेष गाडी : हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 26नोव्हेंबर रोजी (रविवारी) सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, घाटनांदूर, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी मार्गे बिदर येथे सायंकाळी 18.30 वाजता पोहोचेल.
02. गाडी संख्या 07506 बिदर ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी : हि गाडी बिदर रेल्वे स्थानकावरून दिनांक 28 नोव्हेंबर रोजी (मंगळवारी) दुपारी 15.00 वाजता सुटेल, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, घाटनांदूर, परळी, गंगाखेड,परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रात्री 23.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 12 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
गुरु नानक जयंती निमित्त नांदेड येथून बिदर करिता अनारक्षित विशेष गाडी