नांदेड(प्रतिनिधी)-सराफा भागात सागर रौत्रे यादव यांच्यावर झालेल्या 7 नोव्हेंबरच्या हल्यातील मुख्य कलाकाराला, केशव नहारेला इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एका बदनाम गु्रपवरून ही मारेकरी युवकांची जमवा-जम झाली होती. या प्रकरणात काही अल्पवयीन आणि काही मोठे असे एकूण 15 जण न्यायालयीन कोठडीत आहेत.
7 नोव्हेंबरच्या दुपारी 4 वाजता एका जुगार अड्ड्यावर झालेल्या भांडणाचा बदला 2 तासात घेईल असे म्हणून केशव नहारे हा युवक येथून गेला होता. त्यानंतर सराफा भागात एक वाढदिवस कार्यक्रमात सागर यादव आणि त्याचा भाऊ मोनु यादव हे दोघे रात्री 8 वाजेच्यासुमारास त्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम संपवून हे दोन्ही भाऊ बाहेर निघाल्यानंतर पाच ते सहा दुचाकींवर आलेल्या युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला करण्यासाठी या युवकांनी तलवारी आणि इतर घातक शस्त्र पोत्यामध्ये भरून आणले होते आणि त्या सहाय्याने दोन्ही बंधुवर हल्ला झाला. त्यात मोनु यादव मृत्यूच्या भितीने पळून गेला आणि तो यशस्वी झाला. परंतू सागर यादव या हल्लेखोरांच्या तावडीत सापला. शेकडो लोकांची गर्दी हा हल्ला पाहत होती. पण कोणीही या हल्याविरुध्द आवाज उठविला नाही. शेकडो लोकांनी एकाच दमात अरे.रे..असा आवाज सुध्दा मोठ्याने केला असता तरी सुध्दा हल्लेखोर पळून गेले असते. परंतू हल्ले खोरांनी सागर रौत्रेचा जिव घेतला आणि मोनु यादव गंभीर जखमी झाला. याप्रकरणातील 15 आरोपी अटक केल्यानंतर इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी आपले सहकारी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या मदतीने केशव नहारेला अटक केली आहे.
हा प्रकार जुगार अड्ड्यामुळे घडला असा सागर रौत्रेच्या कुटूंबियांचा आरोप आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेत उदय खंडेराय यांची नियुक्ती केल्यानंतर जवळपास सर्वांना जुगार अड्डे आणि मटका अड्डे बंद करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रेसनोटमध्ये दररोज अशा गुन्ह्यांची नवीन नवीन गुन्ह्यांची माहिती येत आहे. परंतू सर्वच जुगार अड्डे आणि मटका अड्डे बंद झाले असे मानायला आज तरी जागा नाही.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/08/सागर-यादवच्या-खून-प्रकरण/