नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील बाबानगर भागातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास 35 तोळे सोने चोरून नेले आहे. आजच्या दराप्रमाणे या सोन्याची किंमत जवळपास 21 लाख रुपये होत आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बाबानगर मधील जाधव नावाची व्यक्ती रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. आज त्यांच्या आई घरी आल्यानंतर त्यांचे घर उघडेच अर्थात फोडलेले होते. याबाबत जाधव यांच्याशी प्रशासनाने दूरध्वनीवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी सांगितले. की मी परवाच्या दिवशी अर्थात 25 नोव्हेंबर रोजी येईल आणि तक्रार देईन माझ्या घरात 35 डोळे सोने होते.असे जाधव यांनी प्रसासनाला सांगितले आहे.आजच्या सोन्याच्या दराने याचा गुणाकार केला तर गुणाकाराचा आकडा 21 लाख रुपये पेक्षा जास्त होतो. असे सांगितले जाते की नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा जशी जशी जवळ येत असते त्या प्रमाणात चोऱ्यांमध्ये वाढ होत असते. तसेच माळेगाव यात्रा संपल्यानंतर सुद्धा नांदेड जिल्ह्यात सूर्याची संख्या वाढत असते. परंतु बाबा नगर येथील जाधव हे तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराची रेकी झाल्यानंतरच ही चोरी झाली असेल असा अंदाज बाबानगर मध्ये व्यक्त होत आहे.