नांदेड,(प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी कै.नागोराव जाधव यांच्या पत्नी श्रीमती सुशिलाबाई नागोराव जाधव यांचे बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी ११.३० वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय ८३ वर्ष होते,श्रीमती सुशिलाबाई जाधव यांच्या पच्शात दोन मुले अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव व क्रांती वडजे, ज्योती पवार या मुली,असून त्या माजी खा.विठ्ठलरावजाधव ,डॉ.पी.एम.जाधव यांच्या वहिनी होत.त्याच्या पच्शात सूना ,नातू,पंणतू असा मोठा परिवार आहे.
गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी श्रीनगर नांदेड येथील त्यांच्या निवासस्थापासून अंत्ययात्रा सकाळी १० वाजता निघणार असुन गोवर्धन घाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.