नांदेड(प्रतिनिधी)-सराफा भागात झालेल्या सागर यादव खून प्रकरणात इतवारा पोलीसांनी आजपर्यंत एकूण 21 आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. त्यातील काही पोलीस कोठडीत आहेत, काही न्यायालयीन कोठडीत आहेत आणि काही विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. तरी पण समस्त नांदेडकरांच्यावतीने 30 नोव्हेंबर रोजी न्याय मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे असे एक पत्रक व्हाटसऍपवर व्हायरल होत आहे.
दि.7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास सराफा भागात सागर रौत्रे(यादव) याच्यावर 11 दुचाकींवर प्रत्येकी 3 जण बसून आलेल्या एका गटाने हल्ला केला.त्यात मोनु यादव हा जखमी झाला, तो पळून जाण्यात यशस्वी झाला पण त्याचा भाऊ सागर रौत्रे (यादव) हा मरण पावला. थैल्यामध्ये तलवारी आणि इतर घातक शस्त्र आणून जमावाने सागर यादववर हल्ला केला होता. याप्रकरणाचा तपास इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे करीत आहेत. या प्रकरणात कोणतीही उसंत न घेता इतवारा पोलीसांनी या प्रकरणातील मुख्य कलाकार केशव नहारे उर्फ पवार यास पकडले. यापुर्वी काही मोठी आणि काही छोटे असे 15 आरोपी पकडले आहेत. दरम्यान काल दि.21 नोव्हेंबरपासून व्हाटसऍपवर एक संदेश प्रसारीत होत आहे. त्यामध्ये सागर यादवच्या हत्याकांडासंदर्भाने दि.30 नोव्हेंबर रोजी समस्त नांदेडकर नागरीकांच्यावतीने मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा 30 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता जुना गंज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघेल असे लिहिले आहे. या पत्रावर आयोजक समस्त नांदेडकर असे लिहिलेले आहे. ज्या दिवशी सागर रौत्रे (यादव) ची हत्या झाली. त्यावेळेस उभ्या असलेल्या शेकडो लोकांनी आरडा ओरड केली असती तरी हल्लेखोर पळून गेले असते. मग तेच नांदेडकर आता 30 नोव्हेंबरला सागर रौत्रेच्या हत्याकांडासाठी न्याय मागण्या या नावावर मोर्चा काढणार काय? या न्याय मागण्या काय आहेत याचाही उल्लेख त्या व्हायरल होणाऱ्या पत्रात नाही मग मोर्चा काढून प्रशासनाला त्रास देण्याचा प्रकारच नव्हे काय? असो प्रत्येकाला आपले अधिकार भारतीय संविधानाने दिलेले आहेत.
आजपर्यंत या हत्याकांडाचा हिशोब केला तर एकूण 21 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे. सागर यादवच्या एफआयआरमध्ये नसलेल्या अनेक जणांना पोलीसांनी शोधून काढले आणि त्यांच्यावर कार्यवाही केली आहे.त्या एफआयआरमध्ये एक नाव दोनवेळा लिहिलेले आहे. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये न दिसणाऱ्या काही लोकांची नावे आहेत. याचा अर्थ इतवारा पोलीसांनी या खून प्रकरणातील कायदेशीर कार्यवाही जवळपास पूर्ण केलेली आहे.
आज पोलीसांनी पुन्हा चार जणांना ताब्यात घेतले असून त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. आज पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी न्यायालयात हजर केलेल्या तिन जणांची नावे नितीन उर्फ छोटा चिंग्या सुधाकर जाधव(18), सय्यद इमरान सय्यद गौस (19), सुमित आनंदा कोकरे (18) आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या पुर्वी पकडलेला सागर रौत्रे हत्याकांडातील मुख्य कलाकार केशव नहारे उर्फ पवार हा पुर्वीपासूनच 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
संबंधित बातमी….
https://vastavnewslive.com/2023/11/21/सागर-यादवचा-खून-करणाऱ्या/