नांदेड,(प्रतिनिधी)-आयपीएस अधिकारी गोहर हसन यांची बदली झाली आहे. या निमित्ताने हदगाव आणि भोकर फाटा येथे त्यांनी केलेल्या दोन जुगार अड्ड्यांवरील कार्यवाही बाबत खात्रीलायक माहिती अशी आहे की त्या तीन जुगारण्यांवर छापा टाकायला लावणारा डॉक्टर आणि त्याचे काही कंपाउंडर नांदेडच्या एलसीबी मध्ये कार्यरत आहे. पण हदगाव येथील मूळ अड्डा सोडून दोन छोट्या छोट्या जुगार छापा टाकायला लावणारा पांडुरंग आहे म्हणे.. योगेश्वरा हे पण आपल्या लक्षात असू द्या.
नांदेड जिल्ह्यातून आयपीएस अधिकारी गोहर हसन यांची 20 नोव्हेंबर रोजी बदली झाली. आता ते धाराशिव जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हादगाव आणि भोकर फाटा येथे दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. हे दोन जुगार अड्डे ज्यावर छापा टाकला त्यांचे नावे आणि जागा सांगणारा कोणी पांडुरंग माउली आहे. पण नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे सुरू असणारा जुगार अड्डा एलसीबीच्या डॉक्टरच्या इशाऱ्यावर चालतो ही ही माहिती नव्याने समोर आली आहे. डॉक्टर महोदयांना 1500 मोदक दर महा मिळतात त्यासाठी वेगवेगळी कामे आहेत आता तर डॉक्टर ही सर्व कामे करण्याच्या तयारीला लागला आहे . कारण असे असू शकेल की त्याला दर महा मिळणाऱ्या 1500 मोदकांपेक्षा जास्त मोदके मिळततील.
याच डॉक्टरने सन 2017 मध्ये एलसीबीची रेकी करून त्यानंतर आलेल्या पोलीस निरीक्षकासाठी मार्ग मोकळा केला होता.पण तो पोलीस निरीक्षक नांदेडच्या एलसीबी मध्ये फक्त 13 दिवसांसाठीच थांबू शकला होता. योगेश्वरचे सर्व जगावर बारकाईने लक्ष असते मग त्यांच्या कक्षा खाली असलेल्या कक्षात नजर असणार नाही काय? डॉक्टरांची परीक्षा तर योगेश्वर एका क्षणात करतील आणि पुढे काय होईल हे काही आम्ही लिहिण्याची गरज नाही. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सुद्धा डॉक्टराला असलेल्या आजारांचा शोध घेऊन ते आजार योगेश्वर पर्यंत पोहोचविण्याची सोय केली पाहिजे.