3 कोटी रुपयांचा भुखंड हडपण्याच्या कटासाठी नांदेडचे ऍड.शेख जियाउद्दीनसह 8 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली(प्रतिनिधी)-एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून गणेशवाडी जि.हिंगोली येथील एक भुखंड विकल्याप्रकरणी नांदेडचे नोटरी ऍडव्हकेट यांच्यासह 8 जणांविरुध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दि.20 नोव्हेंबर रोजी ऐवर्श्या सिताराम भाकरे (23) या विधी महाविद्यालयातील विद्यार्थींनीने दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि  त्यांचे वडील सिताराम भाकरे,सौ.वंदना सिताराम भाकरे आणि छोटी बहिण आराध्या सिताराम भाकरे असे चार जणांचे कुटूंब होते. सिताराम भाकरे आणि पहिली पत्नी व माझी आई  स्वप्नाली सिताराम भाकरे हे दोघे डॉक्टर होते आणि मुंबईला राहत होते. आई स्वप्नाली भाकरे यांचा मृत्यू सन 2010 मध्ये झाला. त्यानंतर त्यांची नाळेश्र्वर येथील वंदना शिवाजी वाघ या महिलेसोबत 29 डिसेंबर 2011 रोजी नोंदणीकृत पध्दतीने विवाह केला.त्यानंतर 20 सप्टेंबर 2013 रोजी वंदना भाकरे यांनी माझी छोटी बहिण आराध्याला जन्म दिला. माझे वडील डॉ.सिताराम भाकरे यांना अर्धांगवायुचा झटका आला. त्यानंतर 23 मे 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. माझे वडील सिताराम भाकरे यांचे मृत्यू प्रमाणपत्र आम्ही 6 जून 2018 रोजी नांदेड महानगरपालिकेतून हस्तगत केले. माझ्या वडीलांनी मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारच्या संपत्ती बाबत इच्छा पत्र केले नव्हते. माझ्या वडीलांकडे 80-90 लाख रुपये बॅंकेत होते आणि याशिवाय करोडो रुपयांची स्थावर संपत्ती पण होती. पुढे माझी सावत्र आई वंदना भाकरे आणि माझ्यामध्ये संपत्तीच्या वाटणीवरुन वाद झाला.त्यासंदर्भाने उच्च न्यायालय मुंबई येथे खटले चालू आहेत. परंतू सिताराम भाकरे यांचे कायदेशीर वारस मी माझी सावत्र बहिण आराध्या आणि माझी सावत्र आई वंदना असे तिघेच आहोत. दि.25 नोव्हेंबर 2022 रोजी माझ्या वडीलांचे व माझ्या आईच्या नावावर असलेला गणेशवाडी येथील सर्व्हे क्रमांक 14 मधील भुखंड क्रमांक 2 व 3 यांचे एकूण क्षेत्रफळ 3132 चौरस मिटर आहे. या दोन भुखंडावरील माझ्या  आईचे नाव कमी झाल्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर बळसोड येथील तलाठी यांच्याकडे विचारणा केली असता डॉ.सिताराम भाकरे यांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारावर असे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तरी पण काही लोकांनी माझ्या वडीलांचे बनावट मृत्यूप्रमाणपत्र तयार करून त्या आधारावर 3 कोटी रुपये किंमत असलेला भुखंड क्रमांक 2 आणि 3 खोट्या 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर इसार पावती करून बनावट कागदपत्र खरे आहेत असे दाखवून तो लाटण्याचा प्रयत्न केला.
या तक्रारीत मुद्रांक कागदवर नोटरी करणारा नांदेड येथील ऍड.शेख जियाउद्दीन,  हिंगोली येथील मसिन पठाण, बाभुळगाव येथील  शिवाजी महादाराव गायकवाड, शेख अखील शेख खलील, संतोष श्रीराम गिते, कन्हैया खंडेलवाल, ग्राम अधिकारी बाभुळगाव ज्याचे नाव माहित नाही तसेच महसुल अधिकारी व इतर कर्मचारी अशी 8 जणांची नावे आरोपी सदरात आहेत.या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *