बिलोली (प्रतिनिधी)-तालुक्यातील आदमपुर येथे गेल्या कांही वर्षा पासून अवैद्य विदेशी दारूची विक्री करणारी महिला यमुनाबाई काशा गौड वय 50 वर्ष यांना बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी एस.जी.ठाणेदार यांनी कलम 65-ई, म.दा.का.अंतर्गत 3 वर्षे साध्या कारावासाची शिक्षा व दंड रु 25 हजार जर दंड न भरल्यास 6 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.अशा प्रकरणातील अलिकडच्या काळातील ही सुनावलेली शिक्षा पहिलीच आहे.
आदमपूर येथील यमुनाबाई काशा गौड या महिलेने आपल्या घराच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत विदेशी दारूची अगदी बिनधास्तपणे अवैध्य विक्री करत असे कांही वेळा दारू उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुध्दा केली होती तरी पण कुणाला न जुमानता हा व्यवसाय चालूच होता.अशात रामतिर्थ पोलीस स्टेशनला परत ही महिला दारू विक्री करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक निरीक्षक आर.एस.यांनी सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले होते.येथे प्रत्यक्षपणे विदेशी दारु विक्री होत आहे असे दिसून आल्याने सदर महिलेच्या विरुध्द रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 82/2021 कलम 65-ई नुसार गुन्हा नोंद केला व सदर गुन्हयाचा तपास पो.हे.कॉं. शामसुंदर भवानगीकर यांनी पुर्ण करुन दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी बिलोली येथे दाखल केले.या खटल्यात सरकातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता याचा युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायधीशांनी दि.23 नोव्हेंबर रोजी वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी.हाके यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून प्रशांत केसराळीकर ब.न.358 पो.स्टे.रामतीर्थ यांनी सहकार्य केले.