नांदेड(प्रतिनिधी)-सप्टेंबरमध्ये लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील एका फरार आरोपीला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 सप्टेंबर 2023 रोजी दोन अज्ञात लोकांनी माधव कामाजी दुड्डे यांना धाक दाखवून त्यांची लुट केली होती. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 123/2023 दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आज 23 नोव्हेंबर रोजी रविनगर जुना कौठा येथे राहणार दिपक उर्फ छक्या विनोद भोकरे (24) यास ताब्यात घेतले. त्याने आपला दुसरा साथीदार आवेस उर्फ अब्बु शुटर शेख याच्यासोबत मिळून माधव दुड्डे यांना लुटल्याची कबुली दिली. याप्रकरणात चोरी गेलेल्या ऐवजापैकी 20 हजार रुपये रोख रक्कम स्थानिक गुन्हा शाखेने जप्त करून दिपक उर्फ छक्या विनोद भोकरेला पुढील कार्यवाहीसाठी लिंबगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराय कर्ले, देवा चव्हाण, मारोती मोरे यांचे कौतुक केले आहे.
जबरी चोरीतील फरार आरोपी पकडून स्थागुशाने 20 हजार रुपये रोख जप्त केले