नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने आज राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढवून दिला आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या ज्ञापनानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वित्त विभागाचे उपसचिव वि.अ.धोत्रे यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्य शासकीय व इतर पात्र पुर्ण कालीक कर्मचाऱ्यांना अनुज्ञय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी पाठविलेल्या ज्ञापनानंतर राज्य शासनाने असे आदेश जारी केले आहेत की, 1 जुलै 2023 पासून सातव्या वित्त आयोगानुसार सुधारीत वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील अनुज्ञय महागाई भत्याचा दर 42 टक्केवरून 46 टक्के करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकबाकी महामाई भत्ता नोव्हेंबर 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.राज्य शासनाने जारी केलेला हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांक 202311231633161705 नुसार प्रसिध्द करण्यात आला आहे.
राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढवला; थकबाकी महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनासोबत मिळणार