
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांच्या अत्यंत महत्वपुर्ण पोलीसांनी आज एक तांदुळ भरलेला ट्रक दुपारी पकडला आहे. अद्याप वृत्तलिहिपर्यंत त्या ट्रक कोणीतीही कायदेशीर कार्यवाही झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही. तो ट्रक मात्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभा आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी नांदेड ग्रामीणच्या काही नामवंत पोलीसांनी ट्रक क्रमांक सी.जी.08 ए.यु.9897 पकडला. या ट्रकमध्ये राशनचा तांदुळ भरलेला आहे असे सांगितले जात आहे.हा ट्रक नायगावकडून येत होता. या ट्रकचा चालक जयप्रकाश सुरेंद्रनाथ यादव रा.राजनांदगाव छत्तीसगड हा आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी वृत्तलिहिपर्यंत मात्र या ट्रकबद्दल कोणतीही कायदेशीर कार्यवाही केल्याची माहिती प्राप्त झाली नाही.