नांदेड(प्रतिनिधी)-7 नोव्हेंबर रोजी सराफा भागात सागर यादव या युवकाच्या खून प्रकरणातील 22 व्या क्रमांकाचा आरोपी इतवारा पोलीसांनी काल दि.23 नोव्हेंबर रोजी पकडला. प्रथमवर्ग न्यायालयाने या आरोपीला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
7 नोव्हेंबर रोजी सराफा भागात थैल्यामध्ये भरून आणलेले हत्यार वापरून सागर यादव या युवकाचा खून झाला. त्याचा भाऊ मोनु यादव हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरप्रमाणे 24 पेक्षा जास्त आरोपी त्यात नमुद आहेत. पोलीसांनी या प्रकरणी काल दि.23 नोव्हेंबर रोजी 22 व्या क्रमांकाचा आरोपी हरी रुपेश जोंधळे (19) यास पकडले. या एकूण 22 मध्ये काही आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. त्यांना सुध्दा अद्याप बाल न्यायमंडळाने जामीन दिलेला नाही. आज पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी हरी रुपेश जोंधळेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने 29 नोव्हेंबर पर्यंत मंजुर केली आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/11/22/सागर-रौत्रे-खून-प्रकरणात/