नांदेड,(प्रतिनिधी)-सिडको येथील एक सराफा व्यापारी आपली दुकान उघडण्यासाठी आला. आपली बॅग जमीनीवर ठेवून दुकान उघडण्यास सुरूवात केली आणि त्याची बॅग घेवून एक चोरटा पळाला. दुसरा चोरटा दुचाकी घेवून त्याची वाटच पाहत होतो. हे दोन्ही चोरटे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या रस्त्याने पुढे पळून गेले. या बॅगमध्ये पाच ते आठ लाख रुपयांचा ऐवज असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. हा घटना क्रमांक सकाळी 11.15 वाजता घडला.
नांदेड शहरातील सिडको भागातील सराफा बाजारात अनेक सोन्या-चांदीचे दुकान आहेत. त्यातील एक दुकान उघडण्यासाठी त्या दुकानाचा मालक आला तेंव्हा दुकानासमोर आपली बॅग ठेवून दुकानाचे कुलूप उघड असतांना एक चोरटा तेथे आला आणि त्याने व्यापाऱ्याची बॅग उचलून पळ काढला. मुख्य रस्त्यावर त्याची वाट पाहत उभा असलेला त्याचा साथीदार दुचाकी सुरू करूनच उभा होता. ती दुचाकी पळण्यासाठी तयार होती. बॅग घेवून आलेला चोरटा पटकन त्या दुचाकीवर बसला गल्लीतील काही दुकानदार आरडाओरड करत त्याच्या पाठीमागे पळाले. बॅग घेवून आलेला चोरटा दुचाकीवर बसल्यानंतर ती दुचाकी पळायला लागली. मागे बसलेला चोरटा एका युवकाच्या हाताला लागला होता. परंतू दुचाकीच्या गतीमुळे त्या चोरट्यांना पकडण्यात नागरीकांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, नांदेड ग्रामीणचे अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा चोरीचा घटनाक्रम मुख्य रस्त्यावरच्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरटे बॅग घेवून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सिडको या मार्गावर पळून गेले. सिडको येथील काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे चोरून नेलेल्या या बॅगमध्ये सात ते आठ लाख रुपयांचा ऐवज असले त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी विविध सीसीटीव्ही फुटेज तपासत असून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
संबंधित व्हिडिओ….