नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव येथील सहकार अधिकारी दहा हजाराच्या लाच जाळ्यात अडकल्यानंतर आज बिलोली येथील विशेष न्यायाधीशांनी त्यास 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
18 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार रिध्दी ऍग्रो वेअर हाऊस यांचा परवाना नुतनीकरण करायचा होता. त्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय सहकारी संस्था सहकार, पणन व वस्त्रो उद्योग विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी-1 बाबुराव चत्रु पवार हे 10 हजारांची लाच मागणी करत आहेत. या लाच मागणीची पडताळणी 20 नोव्हेंबर रोजी झाली. पण त्या दिवशी बाबुरा चत्रु पवारने मालकाला बोलावले. 24 नोव्हेंबर रोजी मालक, तक्रारदार हे सर्व गेल्यानंतर 10 हजारांची लाच मागणी करून 10 हजार रुपये लाच स्विकारतांना सहकार अधिकारी बाबुराव चत्रु पवारला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.
आज या प्रकरणाच्या तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक प्रिती जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अटकेत असलेल्या बाबुराव चत्रु पवारला बिलोली न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीशांनी सहकार अधिकारी बाबुराव पवारला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/24/नायगावचा-सहकार-अधिकारी-अ/