नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई येथील 26/11 या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना व निष्पाप नागरिकांना सहयोग नगर कॉर्नर येथे श्रद्धांजली वाहिन्यात आली तसेच संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन वर्ष 9 वे हंसराज सुभाष काटकांबळे विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी भाग्यनगर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हान, लिंबगाव पोलीस स्थानकाचे प्रमुख सी.पी.पवार, अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक सोनाजी सरोदे,नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस सुभाष काटकांबळे, युवक काँग्रेस नांदेड उत्तर विधानसभेचे अध्यक्ष विवेक राऊतखेडकर, रमेश कोकरे,राजेश बिराडे,राजू राठोड, नितेश दुर्गम,रोहित खंदारे, साई देशराज,देवानंद मदाले,विनायक कैरमकोंडा, सय्यद सोहेल आदि उपस्थित होते.