नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.26 नोव्हेंबर रोजी रविवारी मध्यरात्री 12. ते 2 वाजेदरम्यान काबरानगर भागात एका चोरट्याने दोन घरातून लाखो रुपयांची चोरी केली आहे. या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज एका घराच्या कॅंमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
प्राप्त झालेल्या महितीनुसार बालाजी शेषराव नाईक हे शिक्षक घरात झोपले असतांना त्यांच्या घराच्या खिडकीतून गज टाकून चोरट्याने एक मोबाईल आणि झोपलेले अवस्थेतील गुरुजीच्या गळ्यातील चैन काढून घेतले आहे. यानंतर चोरट्याने रविंद्र जोशी यांचे घर फोडून त्यांच्या घरातून 25 ते 30 तोळे सोने चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस विभागातून या दोन घटनांना कोणी दुजोरा दिलेला नाही. हा चोरटा चोरी करत करण्यासाठी फिरत असतांनाचे सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या एका घराच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
सीसीटीव्ही…