
नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्या हस्ते प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव व्यंकट रामतीर्थे, प्रा. डॉ. अविनाश कदम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, शिवराम लुटे, सुधाकर शिंदे, नारायण गोरे, केशव कल्याणकर, उद्धव सातपुते, संभा कांबळे, रामदास खोकले, संदिप एडके, बालाजी शिंदे, पांडुरंग गोवंदे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.