नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीस दलाने एका 19 वर्षीय युवतीचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाहीनंतर तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.
एप्रिल 2023 मध्ये पोलीस ठाणे विमानतळ हद्दीत राहणारी एक 19 वर्षीय युवती आपल्या आईच्या रागावल्याने घर सोडून निघून गेली होती. याबाबत मिसींग क्रमांक 22/2023 दाखल होता. सात महिन्याच्या कालावधीनंतर या युवतीला अनेक प्रकारे शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतू ती मिळवून येत नव्हती. दि.1 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 ऑपरेशन मुस्कान-12 या शोध मोहिमेअंतर्गत या बालिकेचा मोबाईल नंबर मिळवून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने त्या बालिकेचा शोध घेतला आणि ती एकटीच राहत असल्याचे शोधले. त्यानंतर तिला कायद्याच्या बाजू समजून सांगण्यात आल्या आणि त्यानुसार कायदेशीर कार्यवाही करून तिच्या मर्जीनुसार तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. बालक-बालिकांनी, युवक-युवतींनी आपल्या घरच्या मंडळीचे रागावणे पाहुन घर सोडून जाण्यापेक्षा आपली काय बाजू आहे हे समर्थपणे कुटूंबासमोर मांडण्याची गरज आहे. नाही तर बालक-बालिका, युवक-युवती यांच्याबद्दल समाज काय विचार करेल, त्यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेवून त्याचा कसा दुरूपयोग करेल याचा काही एक नेम नाही.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, गणेश जाधव, यशोदा केंद्रे आणि मिसींग क्रमांक 22 चे तपासीक अंमलदार माधव नागरगोजे यांनी परिश्रम घेवून या बालिकचा शोध लावला आहे. आपल्या पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे कौतुक केले आहे.
आईच्या रागावण्याने घरातून निघुन गेेलेली युवती पोलीसांनी शोधली