श्री.बालयोगी व्यंकट स्वामी यांच्या उपस्थितीत समर्थ अर्बन बॅंकेचा शुभारंभ

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना व नागरीकांना वरदान ठरणाऱ्या समर्थ अर्बन क्रेडीट कॉ.ऑप सोसायटी लि.भोकर या बॅंकेचा शुभारंभ माऊली मंगल कार्यालय भोकर येथे दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता प.पु.श्री. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज दत्तसंस्थान पिपळगाव यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॅ.माधवराव किन्हाळकर, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, एकनाथ मोरे, आप्पाराव सोमठाणकर, जिल्हा उपनिबंधक व्ही.आर.देशमुख सहाय्यक निबंधक एम.एल.चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेतकरी आणि नागरीकांच्या हितासाठी समर्थ अर्बन ही सोसायटी येणाऱ्या काळात काम करणार असून भोकर तालुक्यातील अथवा या परिसरातील सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी समर्थ अर्बन हे काम करणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त या परिसरातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब किशनराव पाटील रावणगावकर व संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *