नागपूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड, (जिमाका) – राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दिनांक 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय नमो महारोजगार मेळावा संपन्न होईल. या मेळाव्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नामांकित उद्योजक / इंडस्ट्रीज यांना निमंत्रीत केले आहे.

या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार प्राप्त व्हावा हा प्रमुख उद्देश आहे. जिल्हयातील खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय, कंपनी, फायनान्स, पतसंस्था, खाजगी बँक व उद्योजकांनी आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी आपल्या आस्थापनांवरील रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचीत करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

दहावी/बारावी/आयटीआय/डिप्लोमा/पदवी/पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर अधिसूचीत केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *