नांदेड(प्रतिनिधी)-भोकर बसस्थानकात बस उभी करून डेपोमध्ये जात असतांना तु मागच्या थांब्यावर गाडी का थांबवला नाहीस असे म्हणून रायखोड ता.भोकरयेथील दोन जणांनी बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घडला आहे.
भोकर डेपोचे बस चालक राहु शेषराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ते बस क्रमांक एम.एच.26 बी.एल.1265 ही बस घेवून भोकर येथे पोहचले. भोकर बसस्थानकात प्रवाशी उतरल्यानंतर ते आपली बस घेवून डेपोमध्ये जात असतांना रायखोड ता.भोकर येथील मोतीराम महादु बिलेवाड आणि दिगंबर सायन्ना बिलेवाड या दोघांनी तु मागच्या बस थांब्यावर गाडी का थांबवली नाहीस या कारणावरून माझ्याशी वाद घातला, मला थापडबुक्यांनी मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा केला. भोकर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 304, 306 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 401/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
भोकर बसस्थानकात बस चालकाला मारहाण