नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत सन 2012 पासून जनसंपर्क विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक राजकुमार लोहिया हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने हार्दिक शुभकामना.
महानगरपालिकेत कार्यरत वरिष्ठ लिपीक राजकुमार लक्ष्मीनारायण लोहिया हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपली वयाची 58 वर्ष पुर्ण करत असल्याने ते सेवानिवृत्त होत आहेत. नांदेड नगरपालिकेमध्ये सेवासुरूवात करणारे राजकुमार लोहिया यांनी 38 वर्ष 8 महिने एवढी सेवा दिली आहे. पुर्वीच्या काळात 27 वर्ष त्यांनी कर वसुलीचे काम केले. या काळात त्यांना 10 ते 12 वेळेस उत्कृष्ट वसुली काम केल्यामुळे विशेष सन्मानित करण्यात आले होते. सन 2012 पासून राजकुमार लोहिया महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. राजकुमार लोहिया यांचा सेवानिवृत्तीच्या जीवनासाठी वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने हार्दिक शुभकामना.
मनपातील जनसंपर्क विभागाचे राजकुमार लोहिया सेवानिवृत्त