नांदेड(प्रतिनिधी)-तेहरानगर भागात एका 21 वर्षीय युवकावर तीन जणांनी जिवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यातील एका पकडल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शेख जिया शेख फरीद रा.श्रावस्तीनगर या 21 वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास तेहरानगर भागात अमोल खंदारे, साहिल गोडबोले आणि लखन ढगे या तिघांनी शेख अजहर शेख अनवर (23) रा.श्रावस्तीनगर नांदेड याच्याशी जुन्या भांडणावरून वाद सुरू केला. या वादात हल्लेखोरांनी त्यांच्याकडील चाकूने शेख अजहरच्या पोटात उजव्या बाजूला चाकू खुपसवून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच धावपळ केली. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरिक्षक बाबू गिते, मिलिंद सोनकांबळे हे घटनास्थळी पोहचले. या प्रकरणातील तिन हल्लेखोरांपैकी पोलीसांनी लखन साहेबराव ढगे यास भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 120(ब) सोबत भारतीय हत्यार कायदा गुन्हा क्रमांक 427/2027 मध्ये अटक केली. या प्रकरणाचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक बाबू गिते यांनी लखन ढगेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका 23 वर्षीय युवकावर तीन जणांनी केला हल्ला