नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या अनेक वर्षापासून कौठा नाका ते रविनगर या रस्त्याचे काम सुरू आहे. संतगतीने सुरू असणाऱ्या कामाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मुळात हा रस्ता 80 फुटाचा होता मात्र तो रस्ता 40 फुटावर करण्यात आला. तरी देखील या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आल नाही. सध्या या रस्त्यावरून नांदेड शहरात जाण्यासाठी वाहतुक सुरू झाली आहे. भविष्यात मोठा अपघात घडू नये यासाठी या रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे अशी मागणी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य नागनाथ स्वामी यांनी केली.
सध्या जुना मोंढा परिसरातील गोदावरी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरून जाणारी सर्व वाहतुक बंद करण्यात आली. नांदेड शहरातून सिडको, हडको व इतर ग्रामीण भागासाठी या ठिकाणावरून वाहतुक केली जात होती. मात्र या रस्त्याच्या कामासाठी हा रस्ता तात्पुर्ता बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतुक आता कौठा नाका ते रविनगर या रस्तावरून वळविण्यात आली आहे. विशेषता: हा रस्ता 80 फुटाचा मंजुर झाला होता. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हा रस्ता 60 फुट करण्यात आला. पण प्रत्यक्षात मात्र 40 फुटाचाच रस्ता तयार करण्यात आला. कौठावासियांनी हा रस्ता मोठा करण्यात यावा यासाठी आंदोलनही केल होत. मात्र राजकीय दबावामुळे प्रशासनाने हा रस्ता 80 फुटावरून थेट 40 फुटावर आणून ठेवला. तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. आता या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू झाल्यामुळे किरकोळ अपघातासह मोठे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी हा रस्ता तात्काळ पुर्ण करण्यात यावा अन्यथा कौठा वासियांच्यावतीने आंदोलन करावे लागेल असा इशाराच भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य नागनाथ स्वामी यांनी दिला आहे.