नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयाने दि.23 नोव्हेंबरच्या व्हिडीओ कॉन्फरंसींगमध्ये बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना नविन नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला अनुसरून बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. ज्या पोलीस अंमलदारांची बदली एका शाखेतून दुसऱ्या शाखेत झाली आहे. त्या व्यक्तींची नावे, हुद्दा, बकल नंबर आज दि.30 नोव्हेंबर 2023 च्या सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटापर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या ईमेलवर माहिती पाठवायचे आदेश प्रभारी कार्यालय अधिक्षक किरण देशपांडे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.
बदली झालेल्या परंतू नवीन ठिकाणी हजर न झालेल्या पोलीस अंमलदारांची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आजचा शेवटचा दिवस