नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे उस्माननगरच्या हद्दीतील मंगलसांगवी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
शितल किरण मस्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगलसांगवी येथे त्यांची बहिण शांताबाई सोनकांबळे असे दोघे दिपाली गर्दनमारे यांना भेटण्यासाठी गेले होते. 28 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते 29 नोव्हेंबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान या सर्व महिला झोपल्या असतांना कोणी तरी चोरट्यांनी तो उघडा दरवाजा पाहून घरातील महिलांचे दागिणे व रोख रक्कम असा 1 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गाडेकर अधिक तपास करीत आहेत. या घटनेच्या ठिकाणी पोलीस श्वान पथकाला सुध्दा बोलावण्यात आले होते.
मंगलसांगवीमध्ये घरफोडून 1 लाख 50 हजारांची चोरी