नांदेड (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ पत्रकार तथा प्रजावाणीचे उपसंपादक आणि व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे.
भारतातील पहिले पत्रकार मित्र संघटन असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलच्या वतीने मागील 18 वर्षापासून राज्यातील विविध पत्रकारांचा राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीचे अठरावे राज्यस्तरीय सम्मेलन नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृह येथे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. या संमेलनात राज्यातील उत्कृष्ट पत्रकारांना गौरविण्यात येणार आहे .या पुरस्कारासाठी पत्रकार रवींद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलचे कार्यवाह बाळकृष्ण कासार ,अध्यक्ष गणेश कोळी, जिल्हाध्यक्ष साहेबराव वेळे यांनी दिली आहे.
पत्रकार रवींद्र कुलकर्णी यांना यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अनंतराव भालेराव पुरस्कार, उदगीर तालुका पत्रकार संघाचा शोधवार्ता प्रथम पुरस्कार प्रेस फोरमचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचा ग्रंथ मित्र पुरस्कार यासह अन्य पत्रकाराने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चहा त्यांनी आणि मित्रमंडळाने आनंद व्यक्त केला आहे.