अपंग महिलेची फसवणूक करून त्यांच्या खात्यातील 4 हजार 500 रुपये लांबवले

नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग महिलेला बनवून त्याच्या डाकघर खात्यातील 4 हजार 500 रुपये काढून घेवून ठकबाजी करण्याचा प्रकार हतईपुरा, फुलेनगर कंधार येथे 7 नोव्हेंबर रोजी घडला आहे.
पौर्णिमा पुंडलिक सोनकांबळे रा.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजेदरम्यान त्यांच्या घरी एक व्यक्ती आला आणि मी तहसील कार्यालय कंधार येथील कर्मचारी आहे असे सांगीतले. अपंग लोकांना पैसे उचलण्यासाठी जाणे-येणे शक्य होत नाही म्हणून शासनाने मला पाठविले आहे असे सांगितले आणि पौर्णिमा सोनकांबळे यांचे आधार कार्ड व त्यांचा अंगठा त्या व्यक्तीजवळ असलेल्या मशिनवर घेतला आणि त्यानंतर पौर्णिमा सोनकांबळे यांच्या पोस्ट खात्यातील 4 हजार 500 रुपये उचलून घेतले आहेत. कंधार पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 385/2023 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सानप अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *