बसस्थानकात दोन तोळे सोन्याचे गंठण चोरीला गेले

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना एका 26 वर्षीय महिलेचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ज्याची किंमत 50 हजार रुपये आहे असा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरला आहे.
शुभांंगी जितेंद्र कौशल्ये रा.चिंचोली ता.कंधार या महिला दि.26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास नांदेडच्या बसस्थानकात बसमध्ये प्रवास करत असतांना त्यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याचे गंठण ज्याची किंमत पोलीस अभिलेखात 50 हजार रुपये लिहिली आहे. असा ऐवज चोरून नेला. वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा क्रमांक 547/2023 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *