नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरला आहे. लग्नाच्या दरम्यान सिडको भागातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ एका महिलेचे 60 हजार रुपये आणि एक मोबाईल अशी चोरी झाली आहे.
उमेश शिवचरण परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 डिसेंबरच्या सकाळी 10 ते 3 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या वस्तू असा 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
चंद्रकला संजय टिप्रसेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 डिसेंबर रोजी रात्री 9.45 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय सिडको येथे फोटो सेशन करत असतांना त्यांनी आपली चॉकलेटी रंगाची बॅग नवरदेवाच्या खुर्चीजवळ ठेवली होती. त्यामध्ये 60 हजार रुपये रोख रक्कम आणि 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. तो कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.