नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात बऱ्याच जागी व्यवसायकी, खाजगी व्यक्ती, खाजगी बॅंका, सहकारी बॅंका भारतीय सरकारचे दहा रुपयांचे नाणे स्विकारत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व बॅंकांना पत्र पाठवून 10 रुपयांचे नाणे न स्विकारणे हा गुन्हा आहे. 10 रुपयांचे नाणे या पुढे न स्विकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पत्र निर्गमित केले आहे.
नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना आदी जिल्ह्यामध्ये भारत सरकारने निर्गमित केलेले 10 रुपयांचे नाणे छोटा दुकानदार सुध्दा स्विकारत नाही. ज्या बॅंकांनी हे 10 रुपयंाचे नाणे चलनात आणले. त्या बॅंका सुध्दा हे 10 रुपयांचे नाणे स्विकारत नाही अशी परिस्थिती आहे. परंतू राज्याच्या महानगरांमध्ये 10 रुपयांचे नाणे सर्रासपणे चलनात आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्ममित केलेल्या पत्रानुसार दहा रुपयांचे नाणे स्विकारण्यात हयगय होते. परंतू ही नाणी भारतीय रिजर्व्ह बॅंकेने आपल्या टाकसाळीत तयार केलेली आहेत. या टाकसाळी भारत सरकारच्या अधिकारात असतात. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतीक मुल्य दर्शविणारी स्पष्ट लक्ष्णे आहेत.
नाण्यांचे आयुष्य दिर्घकालीन असल्याने निरनिराळ्या डिझाईनची व मुल्यांची नाणी एकाच वेळी परिवलीत होत असतात. रिजर्व्ह बॅंकेने आतापर्यंत 14 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दहा रुपयंाची नाणी चलनात आणली आहेत. ही सर्व नाणी वैद्य आहेत आणि व्यवहारामध्ये स्विकारता येऊ शकतात. भारतीय रिजर्व्ह बॅंकेने सुध्दा 20 नोव्हेंबर 2016 रोजी वृत्तपत्रात निवेदन देवून 10 रुपये मुल्यांची नाणी सर्व व्यवहारांमध्ये कोणतीही हयगय न करता वैद्य चलन म्हणून स्विकारण्याची विनंती जनतेला केली होती.
दहा रुपयांच्या नाण्याच्या वापराबाबत गैरसमज दुर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करून सर्व बॅंकांनी आपल्या बॅंकेच्या शाखेबाहेर बॅनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरून जनजागृती, बॅंकांच्या ग्रामीण भागातील यंत्रणांचा पुरेपुर वापर करून नागरीकांपर्यंत हा संदेश पोहचवावा. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे प्र्रचलित असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देणारे व्यक्ती, बॅंका कार्यवाहीस पात्र असतील.