नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारीता या पदाचा दुरूपयोग करत शिवाजीनगरच्या ठाणे अंमलदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास पोलीस ठाणे शिवाजीनगरमध्ये ऍड.अनूप श्रीराम आगाशे आणि विनायक किशन कामठेकर हे दोघे आले. पोलीस ठाणे अंमलदार सुर्यवंशी बकल नंबर 882 यांच्यासोबत कायद्याची जाण असतांना त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या शरिरासोबत झटापट केली. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 504, 34 आणि मोटार वाहन अधिनियम कलम185 नुसार गुन्हा क्रमांक 433/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गिते यांच्याकडे देण्यात आला. गुन्हा दाखल करताच अनुप आगाशे आणि विनायक कामठेकर यांना अटक केली आहे.