नांदेड ( प्रतिनिधी)-विविध प्रलंबित मागण्यांकरीता जालना जिल्ह्यात उपोषणास बसलेले दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आले.
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्मिती करून त्यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राम्हण समाजातील विद्याथ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्यात यावे, मंदिरातील पुजारी व पुरोहितांना दरमहा 5 हजार मानधन देण्यात यावे, ब्राम्हण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यात याव्यात, राज्यातील सर्व मंदिरे वंशपरंपरागत पुरोहितांकडे सुपूर्द करण्यात यावीत, शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस पुन्हा खुल्या प्रवर्गातून संधी देवू नये, अशा विविध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी प्रवीण साले, विश्वासशास्त्री घोडजकर, कृष्णा जोशी, आशिष नेरलकर, निखिल लातूरकर, अनिल डोईफोडे, संतोष परळीकर, बंडोपंत कुंटूरकर, शितल खांडील, प्रदीप देशपांडे, प्रदीप भोरे, सतीश भुरे, गोविंद चौधरी, नरेश दंडवते, गिरीश कहाळेकर,मुकुंद वाकोडकर, शशिकांत पाटील, दि.मा. देशमुख, संतोष कुलकर्णी, सखाराम कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, रघुनाथ सरदेशपांडे, निलेश कुंटूरकर, अर्चना शर्मा, मोहिनीराज दिवाकर, मनीषा कुंनशावलीकर आदींसह मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज बांध व भगिनी उपस्थित होते.
जालना येथील उपोषणास बसलेल्या रणनवरे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण